राज्यातील अकरा लाखाहून अधिक शेतकर्‍यांना जुलै अखेरपर्यंत मिळणार कर्जमाफी

जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Updated: Jul 2, 2020, 05:04 PM IST
राज्यातील अकरा लाखाहून अधिक शेतकर्‍यांना जुलै अखेरपर्यंत मिळणार कर्जमाफी  title=
संग्रहित फोटो

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या राज्यातील सव्वा अकरा लाख शेतकर्‍यांना जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी निधी अभावी ठप्प झाली होती. त्यामुळे राज्यातील ११.१२ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी होऊ शकली नव्हती. 

अशा शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य सरकारने बँकांना दिल्या होत्या. मात्र आपली कर्जमाफी कधी होणार याची वाट हे शेतकरी बघत होते. अखेर या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. जुलै अखेरपर्यंत या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना झी २४ तासशी बोलताना दिली. 

यानुसार ११.१२ लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यातील ८१०० कोटी रुपये जुलै अखेरपर्यंत जमा केले जाणार आहेत. राज्यातील ३२ लाख शेतकर्‍यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. या ३२ लाखांपैकी मार्च २०२० अखेरीस १९ लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये १२ हजार कोटी रुपये सरकारने भरले आहेत. तर उरलेल्या ११.१२ लाख शेतकर्‍यांच्या खात्यात जुलै अखेरपर्यंत ८१०० कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. 

कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टास्कफोर्स