सोशल मीडिया वापरावरून मनसैनिकंना राज ठाकरेंच्या कानपिचक्या

'परत कधी सोशल मीडियावर कॉमेंट नको'

Updated: Jan 23, 2020, 07:55 PM IST
सोशल मीडिया वापरावरून मनसैनिकंना राज ठाकरेंच्या कानपिचक्या  title=

मुंबई : 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो...' असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या भाषणाला सुरूवात केली. भाषणाच्या सुरवातीला त्यांनी सोशल मीडियासंबंधी मनसैनिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नसलेल्याचे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. 

सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचं मत पदाधिकाऱ्यांनी मांडलं तर त्या व्यक्तीला मी पदावरून दूर करेन असा असा इशारा देखील राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला.  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष आपली भूमिका मांडत आहेत. यावेळी राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांची आज मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.