मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांनी ट्वीट करून माहिती दिली. टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.
ही शस्त्रक्रिया कोरोना झाल्याने पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
राज ठाकरेंनी ट्वीट करत काय म्हटले
'आपल्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. काही वेळापूर्वी रुग्णालयातून बाहेर पडून घरी पोहोचलो. आपले आशीर्वाद आणि आणि प्रेम असेच कायम असो!'
— Raj Thackeray (@RajThackeray) June 25, 2022
राज ठाकरे यांच्या पायावर 20 जून रोजी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.