मुंबई : Mhada Home Lottery : मायानगरी मुंबईत आपले हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता अनेकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. एक मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. जानेवारी 2022मध्ये म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Mhada Home Lottery in Mumbai)
काल म्हाडाने कोकण विभागाची लॉटरी सुरू केली आहे. पहिल्या एक तासात तीन हजार लोकांनी अर्ज केले होते. या गतीने एका घरासाठी 250 अर्ज असतील. म्हाडाने गेल्या दोन वर्षात काही सवलती दिल्या होत्या, अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
म्हाडाने 2017 ते 2019 या कालावधीत 106 ऑफर लेटर दिले होते. 67 नवीन प्रकल्प सुरू केले आहेत. 14 जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत 1500 कोटी रुपये म्हाडाला आठ महिन्यात मिळाले आहेत. त्यात 14 हजार गाळे, 8 हजार मूळ निवासींचे पुनर्वसन केले आहे. गरीब माणसाला 520 कोटींचा फायदा होणार आहे. स्टॅम्प डय़ुटी जो विकतो त्याने भरायची आहे. SRA मध्येही हाच प्रकार घडला, असे ते म्हणाले.
दोन वर्षांत 185 LOI काढण्यात आले. यातून 17 हजार लोकांना फायदा झाला आहे. एसआरएचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही काही फंड उभा करत आहोत. त्यातून एसआरए प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. एसआरएचे 230 प्रकल्प रखडलेले आहेत. त्यातील 11 प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहेत. 56 म्हाडा वसाहतीत एका-एका बिल्डिंगच्या पुनर्विकासाला आम्ही परवानगी देणार नाही, संपूर्ण वसाहतीचा एकत्र विकास व्हावा, असा विचार आहे, अशी माहिती मंत्री आव्हाड यांनी दिली.