खुशखबर! म्हाडाच्या घरांसाठी १९ ऑगस्टला सोडत

मुंबई महानगर परिक्षेत्रातल्या नागरिकांसाठी मोठी खूशखबर

Updated: Jul 16, 2018, 11:05 PM IST
 खुशखबर! म्हाडाच्या घरांसाठी १९ ऑगस्टला सोडत title=

मुंबई:  कोकण म्हाडाच्या तब्बल ९ हजार १८ घरांसाठी विक्रमी सोडत १९ ऑगस्टला काढण्यात येणार आहे. १८ जुलैपासून अर्जदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ३ हजार ९३७ घरांचा समावेश आहे. देशात कुठेही स्वत:च्या मालकीचं घर असलेल्यांना या योजनेत अर्ज करता येणार नाही. या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या घरांचा समावेश आहे.