मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

पश्चिम मार्गावर कोणताही मेगा ब्लॉग घेण्यात येणार नाही. 

Updated: Mar 23, 2019, 11:59 AM IST
मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक title=

मुंबई : रविवारी मध्य आणि हर्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम मार्गावर कोणताही मेगा ब्लॉग घेण्यात येणार नाही. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मात्र दुरूस्ती कामांसाठी मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे ते कल्याण धीम्या मार्गावर त्याचप्रमाणे कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. या विशेष मेगा ब्लॉग मुळे रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने असणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

रविवारी सकाळी 10:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.37 पासून दुपारी 03.06 पर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या जलद अणि सेमी फास्ट लोकल  दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांत थांबतील. कल्याण स्थानकातून कसाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील पादचारी पूल तोडण्याचे काम केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे ते कल्याण ते दिवा डाऊन मार्गावरील धीम्या आणि फास्ट लोकल सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. 

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला, वाशी दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घण्यात येणार आहे. रविवारी सकाळी डाऊन मार्गावर 11.10 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत आणि अप मार्गावर सकाळी 10.21 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्याण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल या मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील.