माथेरानची राणी लवकरच नव्या रुपात पर्यटकांच्या भेटीला

गुलाबी, पिवळ्या रंगाने हा डबा रंगवण्यात आला आहे.

Updated: Aug 31, 2018, 04:25 PM IST
माथेरानची राणी लवकरच नव्या रुपात पर्यटकांच्या भेटीला title=

मुंबई: पर्यटकांचे आकर्षण असलेली माथेरानच्या मिनी ट्रेनने कात टाकली आहे. पारदर्शक खिडक्या, प्राणी, पक्षी आणि निसर्ग चित्र मिनी ट्रेनच्या डब्यावर काढण्यात आली आहेत. याशिवाय सहा डब्यांपैकी एक डबा वातानुकूलित असणार आहे. लवकरच ही नव्या रुपातील मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

दुसरीकडे मध्य रेल्वेनेही ट्रेनबाबत असा प्रयोग अंमलात आणला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्क शॉपमध्ये प्रयोगिक तत्वावर एका महिला डब्याच्या आतमध्ये आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. गुलाबी, पिवळ्या रंगाने हा डबा रंगवण्यात आला आहे. त्यावर फुलपाखरं चितारण्यात आली आहेत. त्यामुळे एका वेगळ्या रुपात महिला डबा पाहायला मिळणार आहे. आठवडाभरात हा डबा लोकलला जोडण्यात येईल.