मुंबई : मुंबई महापालिकेमार्फत (Mumbai Municipal Corporation) मुंबईत सुरु असलेल्या सागरी किनारा मार्ग (Coastal Road) कामाच्या प्रगतीचा सोमवारी राज्याचे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे ( Tourism Minister Aditya Thackeray) यांनी आढावा घेतला. यावेळी कामाची प्रगती राखण्यासाठी कामगार व इतर साधनसामुग्री यांचे योग्य ते नियोजन करण्यात यावे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन निर्धरित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असेही आदित्य ठाकरे यांनी दिले.
दरम्यान, यावेळी मुंबईतील (Mumbai) मान्सूनपूर्व कामाच्या तयारीचीही (Pre-monsoon work preparation review) यावेळी मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray) यांनी माहिती घेतली. पावसाळ्यातही सागरी किनारा मार्गाची (Coastal Road) कामे नियोजनबद्ध व सुरळीतपणे चालू राहण्याच्या अनुषंगाने कोस्टल रोड टीम तसेच मुंबई महापालिकेच्या सी, डी आणि जी - दक्षिण वॉर्डच्या सहायक आयुक्तांना यावेळी निर्देश देण्यात आले.
ऑनलाईन झालेल्या या बैठकीस संबंधीत महापालिका अधिकारी, अतिरिक्त आयुक्त (पू.उ.), प्रमुख अभियंता (किरप्र) तसेच सी, डी व जी-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. याबैठकीत सागरी किनारा मार्ग प्रकल्पाची प्रगती व मान्सूनपूर्व कामांचा आढावा याबाबत सादरीकरण करण्यात आले. मान्सूनपूर्व कामे करण्यात येत असून पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी पातमुखे (Outfall), खुला नाला (Open Channel) व पंपींगच्या माध्यमातून कोठेही पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच 24 X 7 नियंत्रण कक्ष पावसाळ्यात कार्यान्वीत करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मुंबईतील वांद्रे किल्ला आणि माहीम किल्ला या दोन ठिकाणांना जोडणारा प्रस्तावित बोर्ड वॉक कम सायकल ट्रॅक प्रकल्प हा मुंबईतील नवीन आकर्षण ठरणार असून विविध धर्मीय स्थळांनादेखील तो जोडणारा ठरेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेताना सर्व संबंधीत यंत्रणांनी योग्य ते सहकार्य करावे, असे निर्देश राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज संबंधीत यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिले.
या प्रस्तावित प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आढावा बैठक घेतली. प्राथमिक संकल्पनेनुसार हा प्रकल्प सुमारे 4.77 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामध्ये पादचारी मार्गिका आणि सायकल ट्रॅक या दोन्ही बाबी समाविष्ट असतील. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठी देखील हा प्रकल्प आकर्षणाचा भाग ठरेल.