Aaditya thackeray Vs Shaina NC: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात राज्यातील निवडणुका पार पडतील. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून लवकरच दोन्हीकडचे उमेदवार जाहीर केले जातील. वरळीची जागा ही महाविकास आघाडी खास करुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. वरळीतून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात महायुती कोण उमेदवार देणार? यावर खलबत सुरु आहेत. याता आता शायना एनसी यांचे नाव समोर आले आहे.
वरळी मतदार संघाबाबत महायुतीमध्ये अजूनही संभ्रम आहे. या मतदार संघातून उमेदवार द्यायचा की नाही याबाबत अजून निर्णय नाही.या मतदारसंघात मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांना समर्थन द्यायचं की महायुतीचा वेगळा उमेदवार जाहीर करायचा याबाबत अजूनही एकमत नाही.महायुतीचा उमेदवार जाहीर करायचा असल्यास हा मतदारसंघ भाजपाचा वाटायला जाण्याची शक्यता आहे.या मतदार संघामधून भाजपच्या नेत्या शायना एनसी यांचे नाव चर्चेत आहे.
हायप्रोफाईल वरळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजप नेत्या शायना एन सी यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे.वरळी विधान सभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध भाजपा नेत्या शायना एन सी असा हायप्रोफाईल सामना करण्याचा प्रयत्न केला जाईल. शायना एन.सी या भाजपच्या नेत्या आहेत. तसेच व्यावसायाने त्या फॅशन डिझाईनर देखील आहेत. शायना एन सी यांचे वडिल नाना चूडासामा हे मुंबई शहराचे शेरीफ होते.वरळी विधान सभा मतदारसंघ हा हायप्रोफाईल मतदारसंघ आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघात बीडीडी चाळी, डिलाईल रोड बीआयटी चाळी, जीजामाता नगर झोपडपट्टी, वरळी कोळीवाडा तसेच वरळी सी फेस विभागातील अनेक हायराईज टॅावर ही उच्चभ्रू नागरिकांचे निवास्थान देखील आहेत. महाराष्ट्राच्या विधान सभा निवडणुकीत वरळी विधान सभा मतदार संघाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुती कूणाला उमेदवारी देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शायना एन सी यांची उमेदवार म्हणून चाचपणी करताना महायुतीच्या नेत्यांनी सर्वकष विचार करून त्यांची निवड करत असल्याची माहीती मिळाली आहे.
महायुतीचे नेतृत्व देईल ती जबाबदारी पाडायला तयार आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी जनहितासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी 'झी 24 तास'ला दिली.