राज्यसभेच्या रिक्तजागेवर काँग्रेसची रजनी पाटील यांना उमेदवारी, भाजपकडूनही उमेदवार

Rajya Sabha bypoll :  राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर रजनी पाटील  (Rajni Patil) यांना काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी दिली असून ही राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत.  

Updated: Sep 22, 2021, 02:08 PM IST
राज्यसभेच्या रिक्तजागेवर काँग्रेसची रजनी पाटील यांना उमेदवारी, भाजपकडूनही उमेदवार title=

मुंबई : Rajya Sabha bypoll : खासदार राजीव सातव (Congress MP Rajiv Satav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर रजनी पाटील  (Rajni Patil) यांना काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी दिली असून ही राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रजनी पाटील (Rajni Patil) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर भाजपकडूनही (BJP) उमेदवार देण्यात आला आहे. मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे ही निवडणूक होणार अशीच चिन्हे आहे.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक जाहीर झाली आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार दिला नव्हता, अशी आठवण काँग्रेसने करून दिली आहे.

काँग्रेसने परंपरेची आठवण करून दिली आहे. ही राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला राज्यातील प्रथा-परंपरेची आठवण करून दिली आहे. त्यासाठी त्यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची आठवण करून दिली आहे. आता भाजपने निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. 

राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे 16 मे रोजी पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आवाहनला भाजप कितपत प्रतिसाद देते याकडे लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या उमेदवार रजनीताई पाटील या सध्या जम्मू, काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी आहेत. याआधीही रजनी पाटील राज्यसभेवर होत्या. त्यांना पुन्हा उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. विधान परिषदेसाठीही राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतही त्यांचे नाव आहे.