शरद पवार की अजित पवार गट? जामीनावर जेलबाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी घेतला मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सध्या राष्ट्रवादीचा दोन्हीं गटातील नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीं भेटीगाठी सूरू आहेत. त्यामुळे नवाब मलिक कोणत्या गटात जाणार या चर्चांना उधाण आलं आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 15, 2023, 03:19 PM IST
शरद पवार की अजित पवार गट? जामीनावर जेलबाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी घेतला मोठा निर्णय title=

Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक ( NCP Minister Nawab Malik ) यांना सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) जामीन मंजूर करण्यात आला आणि तब्बल दीड वर्षांनी ते तुरुंगाबाहेर आहे. वैद्यकीय कारणास्तव (Medical Reasons) 2 महिन्यांसाठी हा जामीन असणार आहेत. मनी लॉन्डिंगप्रकरणी (Money laundering) नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. यादरम्यान राज्याच्या राजकारणात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. 

सुप्रिया सुळे स्वागातासाठी हजर
नवाब मलिक तुरुंगात गेले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एक होती. आता राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे नवाब मलिक कोणत्या गटात जाणार या चर्चांना उधाण आलं आहे. नवाब मलिक तुरुंगाबाहेर आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी खासदार सुप्रिया सुळे स्वत: आल्या होत्या. नवाब मलिक कोणत्या गटात जाणार याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी मी या ठिकाणी पक्ष किंवा राजकारणी म्हणून नाही तर माझ्या मोठ्या भावाला भेटायला आले आहे. असं उत्तर त्यांनी दिलं. तसंच नवाब मलिक जेलमध्ये असताना त्यांच्या कुटुंबासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा काळ अडचणीचा होता,  असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

अजित पवार गटही भेटीला
दुसरीकडे, नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी कार्यकर्त्यांसह हजेरी लावली होती. इतंकच काय तर नवाब मलिक यांची कन्या सना मलिक आणि मोठे बंधू कप्तान मलिक यांनी अलिकडेच अजित पवार यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. यातच आज अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आज नवाब मलिकांची भेट घेतली. मलिकाच्या कुर्ल्यातील घरी जाऊन ही भेट घेतली. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ प्रकृतीची विचारपूस केल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेलांनी दिलीय. 

नवाब मलिक यांना सोळा महिन्यांनी जामीन मिळाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही भेट घेतली, आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी ही भेट होती, या भेटीत कोणतीही राजीकीय चर्चा झाली नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. 

नवाब मलिक यांचा मोठा निर्णय
सध्या राष्ट्रवादीचा दोन्हीं गटातील नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीं भेटीगाठी सूरू आहेत. त्यामुळे नवाब मलिक कोणत्य गटात जाणार याची चर्चा सुरु असताच सध्या कोणत्याही गटात जाणार नसल्याचा निर्णय घेतलाय. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नवाब मलिक हे तूर्तास फक्त आरोग्यवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. नवाव मलिक यांना किडनीचा विकार (Kidney disorder) आहे. नवाब मलिक यांची एक किडनी निकामी झाली आहे, मलिक यांची सध्या एकच किडनी कार्यरत आहे. मलिकांवर कुर्ला इथल्या क्रिटी केअर रूग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. 

वजन घटलं
नवाब मलिक यांचे मोठे भाऊ कप्तान मलिक यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. नवाब मलिक यांचं 25 ते 30 किलो वजन घटलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितलं असल्याचं कप्तान मलिक यांनी म्हटलं आहे.