महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस; कोल्हापुर-मुंबई मार्गावर कधी धावणार?

Vande Bharat Express in Maharashtra: कोल्हापूर मुंबई (Mumbai-Kolhapur Vande Bharat) प्रवासाचा वेळ ११ ते १३ तासांचा आहे. हे अंतर आता अवघ्या ७ तासांवर येणार आहे. जाणून घ्या कसं ते...  

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 16, 2023, 12:32 PM IST
महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस; कोल्हापुर-मुंबई मार्गावर कधी धावणार? title=
Vande Bharat Express likely to run mumbai to kolhapur in march

Kolhapur: महाराष्ट्राला आणखी एका वंदे भारत एक्स्प्रेसचे ( Mumbai Kolhapur Vande Bharat Express) गिफ्ट मिळणार आहे. राज्याला पाचवी वंदे भारत लवकरच मिळणार असून मुंबई ते कोल्हापूर (Mumbai-Kolhapur) या मार्गावर ती धावणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून या प्रस्तावित रेल्वेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळं मुंबई ते कोल्हापूर अंतर कमी होणार आहे. 

कोल्हापूरला जाण्यासाठी मुंबई मार्गावर अवघी एकच गाडी आहे. त्यामुळं गर्दीतून या गाडीतून प्रवास करावा लागतो. त्याचबरोबर वेटिंग लिस्टही असते. अशे असतानाच काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेला जोडणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गासाठी गती घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर कोल्हापुरकरांना आता वंदे भारत एक्स्प्रेसचे गिफ्ट मिळणार आहे. मात्र, प्रवाशांना वंदे भारतसाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र असे असले तरी वेगवान आणि आरामदायी प्रवास कोल्हापुरकरांना लाभणार आहे. 

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मुंबई-कोल्हापूर दरम्यान  दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज जंक्शन येथे थांबेल. तर मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी फक्त 7 तास लागणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं शहरांतील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर बारा महिने पर्यटकांनी बहरुन जाते. त्यामुळं भाविकांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस ही मोठी पर्वणी ठरणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं मिरज, सांगलीतील प्रवाशांचीही सोय होणार आहे.

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार हे मात्र अद्याप निश्चित नाहीये.रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींचं कारण देत या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस मार्च 2024 नंतर धावू शकते असं म्हटलं आहे. या मार्गावरील तांत्रिक अडचणी, रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, पुणे मिरज मार्ग दुहेरी करण्याची काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या मिरज- पुणे मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचं काम सुरु आहे. कोल्हापूर आणि मिरज दरम्यानचा मार्ग एकेरी आहे, जेव्हा आमची कामं पूर्ण होतील, त्यावेळी वंदे भारत ट्रेन सुरु करणं शक्य होईल, अशी भूमिका विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी अलीकडेच मांडली होती