'हिंदूहृदयसम्राट एकनाथ शिंदे' बॅनरवरुन नवा वाद... ठाकरे गट आक्रमक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शइंदे यांच्या नावासमोर हिंदूहृदयसम्राट लावल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बाप चोर, पक्ष चोर आणि आता हिंदूहृदयसम्राट म्हणजे आता निर्लज्जपणाचा कळस केलाय अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

राजीव कासले | Updated: Nov 24, 2023, 01:03 PM IST
'हिंदूहृदयसम्राट एकनाथ शिंदे' बॅनरवरुन नवा वाद... ठाकरे गट आक्रमक title=

Maharashra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या वादाला तोंड फुटलंय. एका बॅनरवरुन ठाकरे गट आणि शिंदे गट (Thackeray Group vs Shinde Group) पुन्हा आमने सामने आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या राजस्थानात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे गेले होते. त्या उमेदवाराच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांच्या नावासमोर 'हिंदूहृदयसम्राट' (Hindu Hrudaysamrat) असं लिहिण्यात आलं आहे. या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. 

आदित्य ठाकरे आक्रमक

राजस्थानात निवडणूक प्रचारासाठी लावलेल्या बॅनरवर हिंदूहृदयसम्राट असा शिंदेंचा उल्लेख केल्यानं राजकारण तापलंय. भाजप उमेदवाराच्या रॅली आणि प्रचारासाठी एक बॅनर बनवलण्यात आला होता. यावर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा करण्यात आला होता. यावरुन आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधलाय...बाप चोर, पक्ष चोर आणि आता हिंदूहृदयसम्राट म्हणजे आता निर्लज्जपणाचा कळस केलाय. किती मास्क लावून फिरणार त्यापेक्षा अॅक्टिंगचं काम तुम्हाला चांगलं जमतं...असा टोला आदित्य ठाकरेंनी शिंदेंना लगावलाय..

तर हिंदूहृदयसम्राट असा शिंदेंचा उल्लेख केल्यानं खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलाय. सत्तेसाठी बेईमानी करणा-यांना हिंदूहृदयसम्राट म्हणण्याची नवी परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असावी. बाळासाहेबांनी सत्तेसाठी बेईमानी केलेली नाही. एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट असतील तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट म्हणून काय असं महान कार्य केलंय...? अशा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीय. 

अजित पवार गटाचं प्रत्युत्तर

ठाकरे गटाच्या टीकेला अजित पवार गटानंही उत्तर दिलंय. हिंदूहृदयसम्राट म्हणून पोस्टर लागत असेल तर त्यात गैर काय? असा सवाल अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटलांनी केलाय. एकनाथ शिंदेंनी हिंदूंसाठी काम केलंय, म्हणूनच जनतेनं त्यांचे पोस्टर लावले आहेत असं अनिल पाटील यांनी म्हटलंय. तर  शिंदे कधीही स्वत:ला हिंदुहदयसम्राट समजत नाही असं उत्तर शंभूराज देसाईंनी दिलंय.

राजस्थाननंतर मुख्यमंत्री तेलंगणात

दरम्यान, राजस्थान दौऱ्यानंतर मुख्यमंत्री तेलंगना राज्यात भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. तेलंगना आणि महाराष्ट्राच्या सिमेवर राहणाऱ्या मराठी बहुभाषिक लोकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री भाजपाच प्रचार करणार आहेत. यापूर्वीच शिवसेनेने पाच राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगनात प्रचारासाठी जाणार