मुंबई : एकनाथ शिंदे यांनी नाराज असलेल्या शिवसेनेच्या आणि काही अपक्ष आमदारांना सोबत घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून राज्यात शिवसेनेला खिंडार पडलं. आमदारांनंतर ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेला संघटनात्मक पातळीवरही धक्का बसला. अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर आता सेनेच्या माजी महिला नगरसेविकाही शिंदे गटात प्रवेश करणार आहे. (maharashtra political crisis shiv sena former corporator sheetal mhatre will join eknath shinde group)
शिवसेनेच्या माजी नगरसेविका राहिलेल्या शीतल म्हात्रे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, म्हात्रे या रात्री आठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. त्यामुळे आता शिवसेनेला हा मोठा झटका समजला जातोय.