मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर आता त्यांचा खरा लढा असणारंय तो शिवसेना पक्षप्रमुख (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंसोबत. शिंदेच्या बंडावर ठाकरेंनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देऊन मोदी शहांनी मास्टरस्ट्रोक मारत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. (maharashtra political crisis shiv sena chief uddhav thackeray criticize to eknath shinde)
अर्थात भाजपसोबत सत्ता स्थापन करताना शिदेंनी आपण शिवसेनेचेच आहोत असं वारंवार सांगितलं. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ही बाब रूचलेली नाही. शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. शिवसैनिकांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी सावध प्रतिक्रिया दिलीये.
शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना उभारणीचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. एकीकडे आम्ही शिवसेनेतून फुटलेलो नाही, आमचं मूळ शिवसेनेच आहे, असं शिंदे गटाचे आमदार ठामपणे सांगतायत. मात्र हा युक्तीवाद उद्धव ठाकरेंना मान्य नाही.
त्यामुळे शिंदेंच्या रूपात एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला असला तरी येत्या काळात शिवसेना विरूद्ध शिवसेना हा संघर्ष पेटणार, हे वेगळं सांगायची गरज नाही.