राज्यात नवीन सरकारची नांदी, फडणवीस-शिंदे यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. 

Updated: Jun 30, 2022, 04:26 PM IST
राज्यात नवीन सरकारची नांदी, फडणवीस-शिंदे यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा title=

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता राज्यात सत्तास्थापनेला वेग आला आहे. एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत दाखल झाले. यानंतर एकनाथ शिंदे (Eknatah Shinde) यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांची भेट घेतली. यानंतर आता फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. (maharashtra political crisis devendra fadnavis and eknath shinde go to raj bhavan and claim power to governor bhagat singh koshyari)

एकनाथ शिंदे सागर बंगल्यावर पोहचल्यानंतर फडणवीस यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळेस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. 

या सर्व भेटीनंतर शिंदे आणि फडणवीस एकाच गाडीने सागर बंगल्याहून राजभवनाच्या दिशेने गेले. यानंतर दोघांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला.

फडणवीस-शिंदेंचा आजच शपथविधी 

दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आजच शपथविधी घेणार आहेत. राजभवनावरच संध्याकाळी साडे सात वाजता फडणवीस आणि शिंदे हे दोघे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची ही तिसरी वेळ ठरणार आहे. त्यामुळे या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.