मुंबई : मान्सूनबाबत महत्त्वाची (Maharashtra Monsoon Update 2022) बातमी आहे. राज्यातील विविध भागात पुढील 5 दिवसांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. (maharashtra monsoon update 2022 heavy rain in maharashtra various district upcoming 5 days imd prediction)
आगामी तीन-चार दिवसांत अनेक जिलह्यांमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पाचव्या दिवसापासून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरूवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुण्याच्या हवामान खात्याचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलीय.
बीड जिल्ह्यातील आष्टी परळी केज तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारनंतर काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला पावसाअभावी अनेक ठिकाणी पिकं करपू लागली होती मात्र आज झालेल्या पावसामुळे पिकांना नव संजीवनी मिळणार आहे.
वाशिम शहरासह अनेक ठिकाणी दुपारी पावसाने जोरदार बॅटिंग केली. मुसळधार पडत आलेला पाऊस खरिपाच्या पिकांना पोषक ठरतोय..त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर शहरात पडलेल्या पावसाने सखल भागात पाणी साचले होतं.
चंद्रपूर शहरात पावसाने अचानक हजेरी लावली सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसाने लोकांची त्रेधा उडाली. गणेशोत्सवाचे दिवस असल्याने रस्त्यांवर मोठी वर्दळ आहे.त्यामुळे जिथे आसरा मिळेल तिथे थांबून लोकांनी स्वतःचा बचाव केला. गेले 15 दिवस चंद्रपूरकर उकाड्याने त्रस्त होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.