महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: एकनाथ शिंदे आणि भुजबळांकडे जबाबदारी

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी 

Updated: Dec 7, 2019, 05:21 PM IST
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: एकनाथ शिंदे आणि भुजबळांकडे जबाबदारी title=

मुंबई : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सीमाप्रश्नाच्या खटल्याचा पाठपुराव्याचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. सीमाप्रश्नावर मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, एकनाथ शिंदे तसेच सीमाभागातील प्रतिनिधी उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सुटलेला नाही. हा वाद गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत येतो. पण यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. सीमाप्रश्नाचा हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.
 
महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ५० वर्षांचा वाद हा नेहमी शिवसेनेने लावून धरला होता. आता राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यामुळे हा वाद संपतो का हे पाहावं लागणार आहे. बेळगाव आणि कारवार जिल्ह्यातील जवळपास 865 गावं आणि निपाणी, बिदर सारखे मराठी भाषिकांची संख्या जास्त असलेला भाग हा महाराष्ट्रात समाविष्ट करावा म्हणून अनेक आंदोलनं झाली. पण मराठी भाषिक आज ही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

बेळगाव आणि आजुबाजुच्या भागात जवळपास २० लाख मराठी भाषिक लोकं राहतात. कोणतंच केंद्र सरकार देखील या वाद आतापर्यंत सोडवू शकलेलं नाही. शिवसेनेने अनेकदा कर्नाटक सरकारच्या विरोधात भूमिका घेत त्यांच्यावर टीका केली. या मुद्दा शिवसेनेसाठी नेहमीचा अस्मितेचा राहिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा प्रश्न कशा प्रकारे हाताळतात. हे पाहावं लागणार आहे.