वर्षा बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या व्यक्तीला कोरोना

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासगृहात अर्थात वर्षा बंगल्यामध्ये (Varsha Bungalow) कोरोनाचा (Corona) शिरकाव झाला आहे.

Updated: Nov 15, 2021, 08:50 PM IST
वर्षा बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या व्यक्तीला कोरोना title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासगृहात अर्थात वर्षा बंगल्यामध्ये (Varsha Bungalow) कोरोनाचा (Corona) शिरकाव झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओएसएडी (Uddhav Thackeray OSD) अर्थात विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर नाईक (Uddhav Thackeray OSD Sudhir Naik) यांना कोरोनाची लागण झाली आहे. नाईक यांना कोरोना झाल्याने पुढील लक्षणासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (maharashtra chief minister uddhav thackeray osd officer sudhir naik his tested corona positive)

वर्षावरील कर्मचाऱ्यांना कोणताही धोका संभवू नये, यासाठी निवासस्थानातील कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणी करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आणि संपूर्ण वर्षा निवासस्थानात सॅनिटायझेशन करण्यात आलेलं आहे.

दरम्यान याआधी मार्च महिन्यात वर्षामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली होती.  

मुख्यमंत्र्यांवर उपचार सुरु

दरम्यान मुख्यमंत्री मानेच्या दुखण्यावर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली गेली आहे. त्यांना रुग्णालयातून लवकरच सोडण्यात येणार असल्याचं म्हंटलं जात आहे. 

कोण आहेत सुधीर नाईक 

सुधीर नाईक हे निवृत्त सह नागरी आयुक्त आहेत. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. नाईक यांची 2019 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान सुधीर नाईक यांच्यावर काही महिन्यांपूर्वी जुलैमध्ये आम आदमी पार्टीनंतर भाजपने आरोप केले होते. सुधीर नाईक हे भंडारी सहकारी बॅंकेच्या मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेत आडकाठी करत असल्याचा आरोप आपने केला होता.