मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) सत्तेत येऊन दीड महिना उलटल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. संपूर्ण राज्याचं लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकजे लागून राहिलं होतं. आता मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे.
उद्या सकाळी 11 वाजता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय. राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचंही कळतंय. पहिल्या टप्प्यात 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यात बैठक सुरु असून बैठकीनंतर ते राजभवनावर जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. आता जास्त काळ वाट पाहिला लागणार नाही, असं रामदास कदम यांनीही म्हटलं आहे.
पहिल्या टप्प्यात किती मंत्र्यांचा समावेश असेल हा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असेल, असंही रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच मंत्रिमंडळात माझा समावेश नसेल असंही रामदास कदम यांनी सांगितलं आहे.
भाजपचे संभाव्य मंत्री
देवेंद्र फडणवीस
चंद्रकांत पाटील -
जयकुमार रावल
राधाकृष्ण विखे पाटील
प्रविण दरेकर
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
शिंदे गटातील संभाव्य मंत्री
गुलाबराव पाटील
दिपक केसरकर
दादा भुसे
अब्दुल सत्तार
शंभुराज देसाई
संजय शिरसाठ
संदिपान भुमरे