मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते गजानन किर्तीकर आणि मुंबई काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्यातील लढतीमुळे उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १९९९ पासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या उत्तर-पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघाने गेल्यावेळी शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, यंदा संजय निरूपम यांनीही आपली संपूर्ण ताकद पणाला लावून मतदारसंघात प्रचार केला आहे. तसेच यावेळी मोदी लाट ओसरल्याने गजानन किर्तीकर यांच्यासाठी ही लढत अवघड मानली जात आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत गजानन किर्तीकर यांनी काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा १,८३,०२८ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी उत्तर-पश्चिम मुंबईत ५०.५७ टक्के मतदान झाले होते. तर यंदा याठिकाणी ५४.७१ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे आता गजानन किर्तीकर आणि संजय निरूपम यांच्यामधील लढतीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
लाईव्ह अपडेटस्
* वायव्य मुंबई मतदारसंघात गजानन किर्तीकर यांचा दणदणीत विजय
* गजानन किर्तीकर २,५२,७१३ मतांनी आघाडीवर
* वायव्य मुंबईत गजानन किर्तीकर ५१८७० मतांनी आघाडीवर
* वायव्य मुंबईतून गजानन किर्तीकर १६३३९ मतांनी आघाडीवर
* वायव्य मुंबईत गजानन किर्तीकर १६ हजार मतांनी आघाडीवर
* वायव्य मुंबईत शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांना ५६१५ तर संजय निरुपम यांना १५३८ मते
* थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात, सर्वांना निकालाची उत्सुकता
Counting of votes for #LokSabhaElections2019 begins. #ElectionResults2019 pic.twitter.com/ez0j6ivcnD
— ANI (@ANI) May 23, 2019