मुंबई: भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या उत्तर मुंबईची लढत यंदा कधी नव्हे इतकी रंगतदार झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या गोपाळ शेट्टी मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी गोपाळ शेट्टी देशातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार ठरले होते. त्यामुळे यंदा उत्तर मुंबईचा पेपर भाजपसाठी सोपा मानला जात होता. याशिवाय, गोपाळ शेट्टी यांचा मतदारसंघातील जनसंपर्क आणि विकासकामे पाहता त्यांचा गड अभेद्यही मानला जात होता. त्यामुळे काँग्रेसकडून कोणताच उमेदवार त्यांच्याविरोधात रिंगणात उतरायला तयार नव्हता. परंतु, अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देत अनपेक्षित डाव टाकला होता.
सुरुवातीला उर्मिला मातोंडकर यांचा गोपाळ शेट्टी यांच्यापुढे निभाव लागणार नाही, असे म्हटले जात होते. मात्र, उर्मिला यांची राजकीय जाण अत्यंत प्रगल्भ असल्याचे लक्षात आल्यानंतर उत्तर मुंबईतील प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत आली होती. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत ही निवडणूक गोपाळ शेट्टी यांच्यासाठी तितकीशी सोपी राहिली नव्हती.
याशिवाय, मुंबईतील एकूण सहा मतदारसंघांपैकी याच मतदारसंघात सर्वाधिक मतदान (५९.३२ टक्के) झाले होते. तसेच येथील मतदानाचा टक्काही २०१४ च्या तुलनेत वाढला होता. त्यामुळे ही गोष्ट गोपाळ शेट्टींसाठी धोक्याची घंटा असल्याची चर्चा सुरु झाली होती. यापूर्वी उत्तर मुंबईतून अभिनेता गोविंदा याने भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांना धूळ चारली होती. त्यामुळे उर्मिला मातोंडकरही असा चमत्कार करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
निकालाचे लाईव्ह अपडेटस्
* उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांचा विजय; काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर पराभूत
* गोपाळ शेट्टी यांना ४,२१,९५१ मतांची आघाडी
* उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टीच वरचढ; लाखभरापेक्षा जास्त मतांची आघाडी
* उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी ४२८२० मतांनी आघाडीवर
* गोरेगाव मतमोजणी केंद्रावर सावळागोंधळ; दीड तास उलटूनही पहिल्या फेरीचाही निकाल नाही
* उत्तर मुंबईत उर्मिला मातोंडकर पिछाडीवर; गोपाळ शेट्टींची दमदार सुरुवात
* थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात
मुंबईतील 'या' उमेदवाराचा विजय पक्का; २००० किलो मिठाईची ऑर्डर
Counting of votes for #LokSabhaElections2019 begins. #ElectionResults2019 pic.twitter.com/ez0j6ivcnD
— ANI (@ANI) May 23, 2019