केजरीवालांच्या अडचणीत वाढ, काँग्रेसनंतर भाजपाचीही निवडणूक आयोगात तक्रार

 मतदारांना रेडीओच्या जाहीरातीवरून भ्रमित करण्याचा आरोप केजरीवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

Updated: Apr 28, 2019, 08:07 AM IST
केजरीवालांच्या अडचणीत वाढ, काँग्रेसनंतर भाजपाचीही निवडणूक आयोगात तक्रार  title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदारांना रेडीओच्या जाहीरातीवरून भ्रमित करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शनिवारी निवडणूक आयोगाकडे केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली. अवैध घुसखोरांसदर्भातील भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधातील वक्तव्य मोडतोड करुन दाखवल्याचा ठपका केजरीवाल यांच्या विरोधात ठेवला आहे. दिल्ली भाजपाचे प्रवक्ता प्रवीण शंकर कपूर यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले. या पत्रात आम आदमी पार्टीच्या रेडीओवरील जाहीरातीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

केंद्रातील सरकार दिल्लीच्या लोकांकडून हजारो-कोटी रुपयांचा कर उकळते पण 325 कोटी रुपयेच दिल्लीला देते असे रेडीओ जाहीरातीत मुख्यमंत्री केजरीवाल म्हणत असल्याची तक्रार आहे. आपची जाहीरात ही वस्तूस्थितीला धरून नसल्याने त्याची चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे. 

Image result for arvind kejriwal zee news

काँग्रेसला दिल्लीत हिंदू मतं मिळणार नाही अशा वक्तव्यावर केजरीवाल यांच्याविरोधात दिल्ली काँग्रेस कमेटीने देखील तक्रार केली होती. निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केजरीवालांनी सांप्रदायिक भावना भडकवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यामुळे आम आदमी पार्टीच्या संयोजकांच्या निवडणूक प्रचारावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.