विरार : विरारमध्ये सहा वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाला परिसरातल्या रहिवाशांनी चोप देऊन, त्याती नग्न धिंड काढली. विरारमधील बोळींज भागातील इमारतीत एक महिन्याभरापूर्वीच सहानी नावाचा हा नराधम सुरक्षारक्षक म्हणून कामाला लागला होता. तो मूळचा बिहारचा आहे. शनिवारी याच इमारतीतील सहा वर्षाची बालिका शिकवणीवरून घरी परतत असताना तिचा पाठलाग करुन तिच्यावर अतिप्रसंग केला. मुलीने घडलेला प्रसंग आईवडीलांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
परिसरातल्या नागरिकांना ही घटना कळताच या नराधमाला बेदम चोप देत त्याची नग्न धिंड काढत पोलिसांच्या स्वाधीन केलं. अर्नाळा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सुरक्षारक्षकांमध्ये असलेल्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवरून नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे
Maharashtra: Locals thrashed a security guard of a society in Virar on July 14, accusing him of molesting a minor girl. A case has been registered by the police and investigation is underway. pic.twitter.com/nBl7oCVEuu
— ANI (@ANI) July 15, 2019