दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू झालंय... पाहुयात... ते या भाषणात कोणकोणत्या मुद्यांना हात घालतायत...

Updated: Sep 30, 2017, 10:02 PM IST
दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका title=

मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं. त्यांनी या भाषणात त्यांनी नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक, कथित गोरक्षकांचा हैदोस, मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, काश्मीर प्रश्न, बीएचयूतलं विद्यार्थीनींचं आंदोलन अशा अनेक विषयांवर भाष्य केलंय... पाहुयात काय काय म्हटलंय उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात.. 

काय म्हटलंय उद्धव ठाकरेंनी, पाहा...

- नेमकं मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेननं का जोडताय?

- बुलेट ट्रेन फुकटचा नागोबा, पोसणार कोण? हा खटाटोप कशासाठी?

- गोरगरिबांची झोप तुम्ही उडवली

- उन्नत मार्ग कधी होणार?

- ५०-४० रुपये दरानं पेट्रोल दिलंत तर तुम्हाला खोटं बोलावंच लागणार नाही... शिवसेनाही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल

- जीएसटीमुळे आणखीन दरवाढ झाली

- पुढची पाच वर्ष जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवा

- रोहिंग्याची ब्याद आम्हाली हिंदुस्थानात नकोय... लाथ मारून त्यांना घालवून लावा

- मानवतावादाचा नसता अतिरेक नका... भारतात रोहिंग्यांना थारा देऊ नका

- बेकायदा बांग्लादेशींना भारतातून बाहेर काढा

- देशात सगळीकडे एकाच माणसाचा फोटो... अभ्यासक्रम बदलला तर आपण भगतसिंग, राजगुरूंसारख्या स्वातंत्र्यवीरांनाही विसरून जाऊ... कारण इतिहासातही हेच असतील...

- नोटबंदी का केली? कशासाठी केली? कुणासाठी केली? कुणालाच माहीत नाही

- सर्जिकल स्ट्राईक, नोटबंदीनंतर दहशतवादी हल्ल्यांत वाढ - उद्धव ठाकरे

- सत्तेत राहुनही शिवसेना सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करतेय - उद्धव ठाकरे

- आपण अडानी... आणि बाकी सगळे अदानी - उद्धव ठाकरे

- नोटाबंदीविरोधात शिवसेनेनं पहिल्यांदा आवाज उठवला होता - उद्धव ठाकरे

- काश्मीरमध्ये मुफ्ती आणि त्यांच्या मुलीच्या खुर्चीला खुर्ची लावून सत्ता भोगत आहात... विचारांची नाळ कुठे जुळते का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

- नोटबंदीसाठी, सर्जिकल स्ट्राईकसाठी जसं धाडसं दाखवलं तसं काश्मीरचं कलम काढण्यासाठी धाडस दाखवणार की नाही?

- काश्मीरमध्ये सत्तेसाठी भाजपची लाचारी

- जनतेला गृहीत धरू नका

- आम्ही आमचा झेंडा भगवाच ठेवलाय... तो कधीही बदलणार नाही - उद्धव ठाकरे

- २५ वर्ष शिवसेनेनं भाजपचे चाळे खपवून घेतले - उद्धव ठाकरे

- भाजपाचे लोकं म्हणतात की वंदे मातरम बोलणं देशद्रोह नाही, जर आपल्या मातेचा आपल्याला मान राखता येत नसेल तर मग दुसऱ्यांना कशाला तुमच्या नसलेल्या छात्या फुगवून दाखवताय

- जीएसटीच्या वेळी शिवसेनेने भूमिका लावून धरली नसती तर मुंबईसह २७ महापालिकांचं उत्पन्न बुडालं असते

- गाईला जपायचं, ताईला बदडायचं... हे असलं हिंदुत्व आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी शिकवलेलं नाही

- हिंदुत्वाचं थोतांड सुरू आहे

- बनारस हिंदू विद्यापीठात मुलींवर अत्याचार

- विद्यार्थ्यांचे पेपर गहाळ होतायत, ऑनलाईन घोटाळे होतायत, त्यांच्या हातातून लॅपटॉप जाऊन बॉम्ब आले तर काय?

- बीएचयूमध्ये मुलींनी छेडछाड करणाऱ्यां विरोधात तक्रार केली, त्यांना दिलासा देण्याऐवजी त्या मुलींना लाठीमार करून बडवून काढलं, हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही़

- मनोहर पर्रिकर बाहेरुन मांस आणण्याची हमी देतात

- गाईबद्दल भाजपची भूमिका सतत बदलतेय

- देवळातली घंटा बडवणारा हिंदू नको... देशद्रोह्यांना बडवणारा हिंदू हवाय

- हिंदुत्वाची तुमची नेमकी व्याख्या काय?

- सौभाग्य योजना आणली आहे, घराघरात वीजजोडणी फुकट, मग असं असेल तर गावागावत जाहिरात का देता, वीज बिल भरलं नाही तर दंडास पात्र, त्यांची वीज जोडणी तोडून टाकता

- जे बिल भरू शकत नाही त्यांना कारावासाची शिक्षा देताय, ज्यांना बिल परवडत नाही त्यांना जोडणी फुकट देता?

- दारीद्र्य दाखवणारा उजेड पाडू नका, एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं असं आहे

- वीज देणार, गॅस देणार आणि भाज्या महाग करणार

- आम्ही तुम्हाला चणे देणार पण दात पाडणार, बसा चणे चघळत... असा भाजपचा कारभारउजेडचं द्यायचा असेल तर दारिद्र्य दाखवणारा उजेड नकोय... दारिद्र्य नाहिसा करणारा उजेड दाखवा

- सत्तेत रमणं वेगळं आणि सत्ता राबवणं वेगळं... आम्ही गोरगरिब जनतेसाठी सत्ता राबवतोय

- पवार म्हणाले सत्तेत राहून तुम्ही टीका कशी करता? आम्ही तुमच्यासारखी अदृश्य हातांनी साथ देत नाही... आमच्याकडे पारदर्शक शब्द नाही, आमच्याकडे खणखणीत आहे. तुम्ही स्व:त काय करता ते बघा ना, महागाई विरोधातील आंदोलन शिवेसेनेने सुरु केलं, ही तर नुसती सुरुवात आहे, असं काही करण्याच्या अवस्थेत तुम्ही राहिला आहात का ? तुम्ही जनतेचा विश्वास गमावून बसला आहात

- हिंदू म्हणून शिवसेनाप्रमुखांनी पंखाखाली घेतलं होतं, त्या हिंदूंमध्ये फूट पाडून आपल्या अंगावर सोडण्याचं काम भाजपाने केलं... ज्यावेळी हिंदुत्व फुटेल तेव्हा तुमचे नशीब फुटेल

- हिंदू आणि मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचं काम तुम्ही करू नका

- काम करत नाही पण २०१९ ची तयारी सुरू केली आहे

- मी पवारांचा शिष्य नाही... मी बाळासाहेबांचा शिष्य आहे... लपून छपून काम करत नाही... साथ द्यायची तर उघडपणे... लाथ घालायची ती पण उघडपणे... - उद्धव ठाकरे

- तुम्ही करत नाही म्हणून आम्हाला करावं लागतंय, याची लाज वाटू द्या, पवारांना टोला

- आज लोकांना कुणाचा विश्वास वाटत असेल तर तो शिवसेनेचा आणि माझ्या शिवसैनिकांचा

- सतत पाचव्यांदा शिवसेना मुंबई आणि ठाण्यात जिंकून आली हे श्रेय शिवसैनिकांचं...

- सोशल मीडिया प्रभावी आणि दुधारी हत्यार आहे... आज तो संपूर्ण सोशल मीडिया तुमच्यावर उलटलाय

- तरुणांना समजून घेण्याऐवजी तुम्ही त्यांना नोटीसा पाठवता, धमक्या देता?

- हे तरुण रोहिंग्या नाही, तर तुम्ही त्यांना धमक्या देणार असाल आणि त्यातून क्रांतीकारक जन्माला आले तर दोष कोणाला देणार

- नवसाचं बाळ असावं असं जनता तुमच्यावर प्रेम करत होती, नवसाचं बाळ वाह्यात झालंय असं कळाल्यानंतर जनतेने तुमच्या कानाखाली मारली तर तुम्ही त्यांना दोष देऊ नका

- अशा अनेक लाटा आम्ही छातीवर घेतल्या... ही लाट आता ओसरलीय....

- शिवसेनेने आंदोलन सुरु केलं आहे, ते पेटत जाणार, चिघळत जाणार... पंतप्रधानांच्या नावाचे अचकट विचकट घोषणा देऊ नका... आपला लढा गोरगरीब जनतेसाठी आहे...  लाठीची आम्हाला परवा नाही