बाबांच्या मदतीसाठी धावल्या सुप्रिया सुळे; पाहून पंतप्रधान मोदीही भारावले 

शिवाजी पार्कवरील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा फोटो चर्चेत, सोशल मीडियावर होतंय कौतुक 

Updated: Feb 7, 2022, 11:03 AM IST
बाबांच्या मदतीसाठी धावल्या सुप्रिया सुळे; पाहून पंतप्रधान मोदीही भारावले  title=

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या या रविवारी अनंतात विलीन झाल्या. शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील बापलेकीचं अनोखं नातं सर्वांनाच पहायला मिळालं. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील नातं पाहून चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भारावले. 

लतादीदींच्या अत्यंदर्शनासाठी शरद पवारांनी आपले बूट खालीच काढले होते. दर्शनानंतर पवार खाली उतरले. त्यावेळी पवारांना पुन्हा बूट घालण्यास त्रास होतोय हे खासदार सुप्रिया सुळेंनी हेरलं.

आपल्या वडिलांना त्रास होतोय. त्यांना मदतीची गरज आहे हे हेरल्यानंतर सुप्रिया सुळेंनी लगेचच आपल्या पदाचा, राजकीय वलयाचा कसलाही विचार केला नाही आणि आपल्या वडिलांच्या पायात बूट घातले.

यावेळी समोरच बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ही गोष्ट पाहिली आणि ते ही भारावून गेल्याचं कॅमे-यात कैद झालंय. या प्रसंगावरून बापलेकीचं नातं असं असावं अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. 

नेमकं तेथे काय घडलं? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेतलं. यानंतर ते खाली येऊन खूर्चीवर बसलेही. त्यांच्यापाठोपाठ राज्यपाल, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनीही अंत्यदर्शनं घेतलं. (दीदींना अखेरच्या प्रवासात बहीण आशाची साथ, शेवटचा फोटो डोळ्यात पाणी आणणारा) 

दरम्यान, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही यावेळी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, आदर पूर्वक जायला हवं, म्हणून ज्येष्ठ राजकीय नेते असलेल्या शरद पवार यांनी आपल्या पायातील बूट खालीच काढले होते.

यानंतर ते खाली उतरले तेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांनी जे पाऊल उचललं, ते कौतुकास्पद होतं, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील शिवाजी पार्कमध्ये आले होते.  लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

त्यामुळे सोमवारी महाराष्ट्रात सरकारी कार्यालये, शाळा आणि बँकाना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती.