कुर्ला रेल्वे स्टेशनवर चोर पोलिसाचा खेळ

ही बाब त्या प्रवाशाच्या लक्षात येताच त्याने चोर चोर असा आरडोओरडा केला. 

Jaywant Patil Updated: Mar 16, 2018, 09:13 PM IST

मुंबई : कुर्ला रेल्वेच्या हार्बर मार्गावर एक प्रवासी पनवेलकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन मधे चढत असताना चोराने त्याचा मोबाईल चोराला. ही बाब त्या प्रवाशाच्या लक्षात येताच त्याने चोर चोर असा आरडोओरडा केला. 

चोराला पकडण्यासाठी धावपळ

ही बाब तिथे तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा जवानांच्या लक्षात आली, आणि त्यांनी त्वरित त्या चोराला पकडण्यासाठी धावपळ केली, आणि सुरू झाला चोर पोलिसांचा खेळ. मोबाईल चोर कधी रुळावरून तर कधी प्लॅटफॉर्मवरून धावू लागला, त्याच्या मागे आरपीएफ जवान धावू लागले. 

वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

अखेर चोराला जवानांनी पकडले. हा सर्व प्रकार प्लॅटफॉर्मवर असलेल्या वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या आरोपीला पकडून वडाळा जीआरपीकडे सोपवण्यात आलं.