मुंबई : मुंबईत आणि मुंबईच्या बाहेर गेल्या १ वर्षात ९ मिसळ महोत्सवाच्या अभूतपूर्व यशानंतर आता आराध्य फाउंडेशनने ५ दिवसांचा कोकण-कोल्हापूर महोत्सव, काळाचौकीच्या अभुदय नगरच्या शहीद भगतसिंग मैदानावर आयोजित केला आहे. ६ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव चालणार आहे.
कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, मटण फ्राय, मटन चाप, मटण सुका, रक्ती मुंडी, अंडा खांडोळी, पिठलं भाकर, पैलवान कट वडा तर कोकणातल्या गावरान चिकन, कलेजी, वजरी, चिंबोरी मसाला, शिंपल्या, पापलेट फ्राय, बोंबील फ्राय य़ाचा आस्वाद तुम्हाला या महोत्सवात घेता येणार आहे.
सोबतच वसईची फ्रोजन आईस्क्रीम, चेंबूरचा फालुदा, कुल्फी, मटका आईस्क्रीम, पेण-पनवेलचे खरवस, औरंगाबादचं फ्रुट सलाड, पुण्याचे सुप्रसिद्ध यश बर्फाचा गोळा, औरंगाबादचा साबीरभाई पानवाला, विरारच्या हरीश भाईचे मुखवास, पॉप कॉन कॅंडी, सोडा पब, कोल्हापूरची बाबा भेळ आणि बरचं काही खवय्यांना येथे खायला मिळणार आहे.
सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत ५ दिवस हा महोत्सव चालणार आहे.