आदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेचं 'केम छो वरली'

वरळीतून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता आदित्य ठाकरेंनी मराठीसह इतर 

Updated: Oct 2, 2019, 11:34 AM IST
आदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेचं 'केम छो वरली' title=

मुंबई : वरळीतून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता आदित्य ठाकरेंनी मराठीसह इतर भाषिक मतदारांना आकर्षित करण्याचा चंग बांधलाय. वरळीच्या विविध भागात सध्या 'केम छो वरळी' असा सवाल विचारणारे आदित्य ठाकरेंचे फ्लेक्स लागले आहेत. गुजराथी आणि तेलगू भाषेतले फ्लेक्स सध्या वरळीत झळकले आहेत. मराठी भाषकांची शिवसेना आता बहुभाषकांमध्येही प्रचाराला लागल्याचं दिसून येतंय. 

आदित्यच्या रूपात प्रथमच ठाकरे घराण्यातली व्यक्ती निवडणूक लढत आहे. त्यापुढे जात आता आदित्यने मराठी माणसांचीच शिवसेना ही प्रतिमा पुसायचा चंग बांधलेला दिसतोय. कॉस्मोपॉलिटन वरळी मतदार संघात इतर भाषातली पोस्टर्स झळकली आहेत. 

केम छो वरली या आदित्य ठाकरे यांच्या पोस्टरबाबत सोशल मीडियावर चांगलीच टीका होते आहे. अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवरुन शिवसेनेच्या गुजराती पोस्टरचा समाचार घेतला आहे. 

शिवसेनेचा वाघ आता ढोकळा खायला लागला अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष असे बिरुद मिरवणारा पक्ष आता 'केम छो वरली' म्हणतोय 'वा रे राजकारण' असेही एका नेटकऱ्याने म्हटले आहे. दादा काय झालं मराठीचा विसर पडला का? असे एका नेटकऱ्याने विचारले आहे.