लालबागचा राजाला 11 दिवसात नेमकं किती दान मिळालं? 1, 2 कोटी नव्हे तर तब्बल...; सोनं, चांदीचाही ढीग

Lalbaugcha Raja: गणेशोत्सव (Ganeshotsav) अखेर संपला असून आता गणेशभक्तांना पुढच्या वर्षाची आस लागली आहे. दुसरीकडे मोठ्या गणेश मंडळांकडून भक्तांनी पैसे तसंच सोनं, चांदीच्या रुपात मिळालेल्या दानाची मोजदाद सुरु आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 20, 2024, 08:39 PM IST
लालबागचा राजाला 11 दिवसात नेमकं किती दान मिळालं? 1, 2 कोटी नव्हे तर तब्बल...; सोनं, चांदीचाही ढीग title=

Lalbaugcha Raja: गणेशोत्सव (Ganeshotsav) अखेर संपला असून आता गणेशभक्तांना पुढच्या वर्षाची आस लागली आहे. गणेशोत्सवात मंडपांकडे दर्शनासाठी वळणारे पाय आता कार्यालयांच्या दिशेने वळले आहेत. दुसरीकडे गणेश मंडळं आता पंडाल वैगेरे काढण्याचं काम करत आहेत. तसंच गणेश भक्तांनी पैसे, सोनं, चांदीच्या रुपात मिळालेल्या दानाची मोजदाद सुरु आहे. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाचंही दानाचा मोजदाद पूर्ण झाली आहे. 

20 कोटींच्या सोन्याच्या मुकुटासह लालबागचा राजाचं विसर्जन? अनंत अंबानींनी दान केलेल्या मुकुटाचं काय झालं?

 

लालबागचा राजा फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्द आहे. गणेशोत्सवातील 11 दिवसांमध्ये येथे फक्त मुंबईच नाही तर देश, जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. फक्त सर्वसामान्यच  नाही तर अमित शाह, अंबानी, शाहरुख खान असे सर्व क्षेत्रातले दिग्गज राजाच्या पायावर डोकं टेकवण्यासाठी हजेरी लावतात. यादरम्यान भक्तांकडून लालबागचा राजाला भरभरुन दान केलं जातं. गणेशोत्सव सुरु असतानाच या दानाची मोजदाद सुरु असते. 

लालबागचा राजाला किती दान मिळालं?

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवात भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण झाली आहे. भाविकांनी गणेशोत्सवातील 11 दिवसात लालबागचा राजाला 5 कोटी 65 लाख 90 हजार रोख रुपये  दान केले आहेत.  तसंच 4151.360 ग्रॅम सोने आणि 64321 ग्रॅम चांदी दानरूपात जमा झालं आहे. 

23 तासानंतर विसर्जन

लालबागचा राजाचं (Lalbaugcha Raja) 23 तासांनंतर बुधवारी सकाळी विसर्जन करण्यात आलं. गणरायाच्या अखेरच्या दर्शनासाठी लाखो गणेशभक्त यावेळी चौपाटीवर उपस्थित होते. लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी अनंत अंबानीही हजेरी लावली होती. लालबागचा राजा गणेश मंडळात प्रमुख सल्लागार पदावर ते आहेत. 

20 कोटींच्या सोन्याच्या मुकुटाचं काय झालं?

बुधवारी सकाळी विसर्जन करण्याआधी लालबागचा राजा गणपतीचा सोन्याचा मुकूट काढून घेण्यात आला. अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या या मुकूटाची किंमत जवळपास 20 कोटी रुपये आहे.