मुंबई : मुंबई, ठाण्यात उन्हाचा चटका कमालीचा वाढला आहे. मुंबईत कमाल तापमान ३८ अशांवर पोहोचला आहे. किमान तापमानही २३ अंशांवर आहे. कमाल तापमानात सोमवारीही वाढ कायम राहणार आहे.
डहाणूमध्येही ३८ अंशांवर पारा गेला आहे. कमाल तापमानात सरासरी ७ अंशांची वाढ झाली आहे. कमाल तापमान ३८ अंशांवरकुलाबा येथे रविवारी ३७.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे ३८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.
कुलाबा येथे २३.५ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानातील वाढ सोमवारीही कायम राहणार असून, मंगळवारपासून त्यात किंचित घट होईल.
डहाणू येथे रविवारी ३८ अंश सेल्सिअस कमाल आणि २३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. दोन्हींमध्ये अनुक्रमे सरासरीच्या तुलनेत ७ आणि २ अंशांची वाढ झाली होती. समुद्र किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३७ अंशांच्या वर जाणे हा उष्णतेच्या लाटेसाठी पहिला निकष आहे
मार्च महिना सुरू झाल्यापासून मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात तापमान वाढ सुरू झाली आहे. त्यातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे वातावरणाचं गणित आणखी बिघडलंय. राज्यात मुंबई ठाण्याशिवाय डहाणू, जव्हार, सुरगाणा, नवापूर, नंदूरबार, अकराणी, तळोदा, अक्कलकुवा तसंच संपूर्ण विदर्भात तापमानात मोठी वाढ होऊ शकते.