Gunratne Sadavarte : पोलीस कोठडी सुनावल्यानंतर सदावर्ते म्हणतात, लवकरच... पाहा पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

Updated: Apr 9, 2022, 06:24 PM IST
Gunratne Sadavarte : पोलीस कोठडी सुनावल्यानंतर सदावर्ते म्हणतात, लवकरच... पाहा पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) यांना न्यायालयाने दोन दिवसांची म्हणजे 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. काल रात्री सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली होती. 

आज त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आलं. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालाने अॅड. गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावताना इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावणावली. सदावर्ते यांनी तात्काळ जामिनासाठी अर्ज केला मात्र कोर्टाने जामीन फेटाळला. 

किला कोर्टातून सदावर्ते यांना LTT मार्ग पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आलं. कोर्टातून बाहेर येताना सदावर्ते यांनी लवकरच 'दूध का दूध, पाणी का पाणी' होईल, जबरदस्ती होत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान, एसीपी शिंदे यांच्यामुळे आपल्याला दुखापत झाली आणि आपल्याला टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागलं, असं सदावर्ते यांनी कोर्टात सांगितलं. पोलिसांनी आपल्याला कशी वागणूक दिली याचा व्हिडिओ आपण दाखवू का अशी विनंती सदावर्ते यांनी कोर्टात केली होती. गुणरत्न सादवर्ते यांची न्यायालयाने खुद्द तपासणीही केली आहे. त्यांना कुठे जखमा झाल्या आहेत का? त्यांना धक्काबुक्की झाली आहे का? याची पाहणी कोर्टाने केली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी मला उच्च रक्तदाव आणि मधूमेहाचा त्रास असल्याचं न्यायालयात सांगितलं. त्यानंतर कोर्टाने सदावर्ते यांना कोठडीत औषधं देण्याची परवानगी दिली आहे. 

सदावर्ते यांचं चिथावणीखोर भाषण?
अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) यांच्याकडून चिथावणीखोर भाषण करण्यात आलं होतं, पवारांच्या निवासस्थानी घुसून जाब विचारणार असं वक्तव्य सदावर्ते यांनी केलं होतं. सदावर्तेंच्या चितावणीनंतरच घरावर हल्ला करण्यात आल्याचा उल्लेख FIR कॉपीत आहेत. 

सदावर्ते यांच्या भाषणाच्या काही क्लिप पोलिसांना मिळाल्या आहेत. त्यांच्या भाषणात अशी अनेक चिथावणीखोर वक्तव्य आहेत. आपल्या भाषणात सदावर्ते वारंवार शरद पवार यांचा उल्लेख करत होते, असं FIR कॉपीत नमुद आहे.