सर्व आंदोलकांना जेलमध्ये टाका, कोर्टाच्या निकालानंतर ST कर्मचाऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

ST Workers : गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर कर्मचारी संतप्त झाले आहेत.

Updated: Apr 9, 2022, 06:02 PM IST
सर्व आंदोलकांना जेलमध्ये टाका, कोर्टाच्या निकालानंतर ST कर्मचाऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया title=

मुंबई : गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी कोर्टाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी किल्ला कोर्टानं हा निकाल दिला आहे. तर इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला आहे. कोर्टाच्या निकालानंतर कोर्टाबाहेर जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सर्व आंदोलकांना जेलमध्ये टाका, असं या कर्मचा-यांचं म्हणणं आहे.

काही एसटी कर्मचा-यांना किला कोर्टाबाहेरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेण्यात आलं आहे. यात काही महिलांचा ही समावेश आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्याबाबत कायदा-सुव्यवस्थेत काय तृटी राहिल्या याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी म्हटलं आहे. एसटी कर्मचा-यांनी निकालाचा आदर राखत शांतता पाळावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

आंदोलकांना सीएसएमटी स्टेशनवरूनही हुसकावण्यात आलं. प्लॅटफॉर्मवर बसलेल्यांना पोलिसांनी गाडीत भरून नेलं. काल आझाद मैदानातून हुसकावल्यानंतर आंदोलक सीएसएमटी स्टेशनवर ठिय्या मांडून बसले होते. त्यानंतर सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानासमोर एसटी कर्मचा-यांनी काल आंदोलन केलं. त्यांच्या घरावर हल्ल्याचाही प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर बारामतीतील पवारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. माळेगाव इथल्या गोविंदबाग या पवारांच्या निवासस्थानी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.