राज्यपाल कोश्यारींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

राज्यपालांची भूमिका महत्त्वाची, सत्तासंघर्षाचा पेच सुटणार की वाढणार?

Updated: Jun 26, 2022, 08:24 AM IST
राज्यपाल कोश्यारींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता title=

मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाचं नाट्य वेगळ्या वळणावर पोहोचलं आहे. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे यांच्यावर मुंबईतील एका खासगी रूग्णालाय उपचार सुरू होते. 

कोश्यारी यांना आज सकाळी 10 वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय अस्थिरता पाहता राज्सपाल कोश्यारी यांची भूमिका महत्वाची असणार आहे.

एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद सध्या सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेनं बाहेर पडण्याची मागणी या गटाची आहे. शिंदे गटातील 16 आमदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 

दुसरीकडे शिंदे गटाकडे बहुमत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या सगळ्यात आता राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज्यपालांच्या भूमिकेमुळे आता पुन्हा एक नवीन वळण या प्रकरणाला येऊ शकतं.