मुंबई : Ganeshotsav 2021 : बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवर बंदी घातली गेली आहे. गणपती (Ganpati) आणण्यासाठी कोरोना लस घेतलेल्या 10 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी (Ganpati Festival) मुंबई महापालिकेची नवी नियमावली जाहीर झाली आहे. (Ganpati Bappa: Only 10 people who have taken corona vaccine are allowed to bring Ganpati)
दरम्यान, मुंबईतील सर्व सरकारी आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर गुरुवारी 9 सप्टेंबरला कोविड लसीचा केवळ दुसरा डोसच दिला जाणार आहे. त्यामुळे गुरूवारी सरकारी आणि पालिका केंद्रांवर कोणालाही पहिला डोस मिळणार नाही, असे मुंबई महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.
कोरोनाच्या धर्तीवर सलग दुसऱ्या वर्षी गणपती उत्सवाची धामधूम मुंबईसह राज्यातही काहीशी ओसारलेली दिसून येत. मात्र, असे असले तरी काही ठिकाणी कोरोना नेहमीचाच असे म्हणून कोविड नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. याच धर्तीवर मुंबईत गणेशोत्सवानिमित्ताने काही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
- बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवर बंदी असून घरगुती गणेशमूर्तींची आगमन मिरवणूक काढू नये. दोन डोस घेतल्यांना सहभागी होता येईल. मात्र, 10 लोकांनाच परवानगी असेल.
- गणपतीची मूर्ती ही घरगुती उत्सवासाठी दोन फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.
- सार्वजनिक गणेशमूर्तींच्या आगमनाच्यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असू नये आणि सर्वांनी कोविडच्या प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावे. गर्दी टाळावी. गणपतीची मूर्ती ही सार्वजनिक उत्सवासाठी 4 फूटापेक्षा जास्त उंचीची नसावी.
- घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी. किंवा पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू/ संगमरवर अशा मूर्तींचे पूजन करावे.
- गणेशोत्सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्यमे इत्यादीद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता भाविकांना प्रत्यक्षदर्शन, मुखदर्शन घेण्यास सक्त मनाई आहे.
- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हार, फुले इत्यादीचा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.