Ganesh Chaturthi 2022 : फाटू न देता कसे बनवाल Perfect उकडीचे मोदक? एकदा हे करुन पाहाच

मोदक करण्याआधी लगेचच वाचा ही माहिती... 

Updated: Aug 30, 2022, 10:37 AM IST
Ganesh Chaturthi 2022 : फाटू न देता कसे बनवाल Perfect उकडीचे मोदक? एकदा हे करुन पाहाच  title=
Ganesh chaturthi 2022 how to make perfect ukadiche modak recepie in marathi

Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीला मुहूर्त (Ganesh Chaturthi 2022 mahurat) आता अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपला आहे. आरास, घराची सजावट, फुलं-पानं, वस्त्र, आभूषणं सर्वकाही तयार आहे, मोठमोठ्या मंडळांच्या तयारीवर शेवटची नजर फिरताना दिसत आहे. त्यातच पहिल्या दिवशी म्हणजेच गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर नैवेद्यासाठी मऊसूत आणि चविष्ट मोदक तयार करण्याचा घाट गृहिणी घालताना दिसत आहेत. 

सगळं वातावरण अगदी चैतन्यमय झालं आहे (Positive vibes). याच वातावरणाला एक गोड किनार देत गणेशोत्सवादरम्यान अनेकजण मोदकांवर ताव मारण्यासाठीही सज्ज झाले आहेत. मोदक.... गणपती बाप्पाच्या नैवेद्याच्या (Naivedyam) पानातला एक अतीव महत्त्वाचा घटक. 

मोदक बनवणं ही जणू एक कलाच. तांदुळाच्या पिठाची पारी, त्यात ओल्या नारळाची गोड चव आणि वरून सुंदर पाकळ्यांची कलाकारी... असा सुरेख मोदक पाहताना मन भरून येतं. पण, बऱ्याचदा असं होतं की, मोदक तयार करताना त्याची पारी फाटते आणि सगळा बेतच फसतो. (Ganesh chaturthi 2022 how to make perfect ukadiche modak recepie in marathi)

ऐन वेळी असं होऊ न देण्यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. मोदक तयार करण्यासाठी तांदुळाचं पीठ योग्य पद्धतीनं तयार करणंही महत्त्वाचं. (ukadiche modak recepie in marathi)

वाचा : Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला उंदीर मामा दिसले तर...'हे' आहेत शुभ-अशुभ संकेत

पारीसाठी पीठ मळण्यापूर्वी, एका जाड तळ असणाऱ्या भांड्यात तांदुळाचं सुगंधी किंवा नेहमीच्या वापरातील पीठ (Rice Flour) आणि पाणी समसमान प्रामाणात घ्यावं. त्यात चिमुटभर मीठ, दोन चमचे तूप (Ghee) आणि अर्धा चमचा तेल घालावं. पाणी उकळल्यानंतर ते आचेवरून उतरवावं आणि त्यात पीठ घालून व्यवस्थित एकजीव करुन घ्यावं. 

पुन्हा हे मिश्रण दोन मिनिटांसाठी गॅसवर वाफण्यासाठी झाकण लावून ठेवावं. पिठाचं मिश्रण गरम असतानाच हाताला तेल किंवा पाणी लावून त्याचा मऊ गोळा मळून घ्यावा. मिश्रण फार वेळ उघड्यावर ठेवू नये. 

पाकळ्या पाडताना काय लक्षात ठेवावं? 
खरी मेहनत मोदकाच्या पाकळ्या पाडल्यानंतर तो बंद करताना असते. मोदकाच्या पाकळ्या कायम विषम संख्येत ठेवाव्यात. पाकळ्या अगदी जवळ किंवा अगदी लांब ठेवता कामा नये. 

मोदकाच्या सारणाची पद्धत ही ज्याचीत्याची वेगळी असते. पण, लक्षात घ्या सारणात गुळ, खोबरं आणि वेलचीसोबतच चिमुटभर मीठही न विसरता घाला. असं केल्यानं मोदकांची चव आणखी वाढते. सारणातही तुपाची धार सोडल्यास एक सुरेख चमक आणि चव मिळते. (Modak stuffing)