Anil Deshmukh: मुकेश अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं प्रकरण; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खळबळजनक आरोप

राज्य सरकारकडून कॅटला अहवाल देण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आली. बक्षिशी म्हणून परमबीरसिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 21, 2023, 07:38 PM IST
Anil Deshmukh: मुकेश अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं प्रकरण; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खळबळजनक आरोप title=

Anil Deshmukh News: 'बक्षिशी म्हणून परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलं, असा गंभीर आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  केला आहे. कॅटनं तीन वेळा राज्य सरकारकडे अहवाल सादर करण्याची मागणी केली, मात्र राज्य सरकारनं अहवाल सादर केला नाही. त्यामुळेच कॅटनं एकतर्फी निर्णय घेतला असा गंभीर आरोप देखील अनिल देशमुख  यांनी केला आहे.

कॅटने एकतर्फी निर्णय घेत त्याचे निलंबन रद्द केल्याचा आरोप

राज्य सरकारने  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांचे निलंबन नुकतेच मागे घेतले आहे. कॅटने वारंवार राज्य सरकारला त्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी अहवाल मागीतला होता. अहवाल न दिल्याने कॅटने एकतर्फी निर्णय घेत त्याचे निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्य सरकारने कॅटला अहवाल का दिला नाही असा प्रश्न उपस्थीत करीत परमबिर सिंग याचे निलंबन रद्द करण्याचा आदेश बेकायदेशीर व आरोपीला संरक्षण देणारा असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

स्फोटक प्रकरणाचा मुख्य सुत्रधार परमबीर सिंह 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे विरोधात राज्यातील वेगवेगळया पोलिस ठाण्यांमध्ये किमान 8 ते 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी, कायदयाचा दुरउपयोग या सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. प्रसिध्द उदयोगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जे जिलेटीन ठेवण्यात आले त्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार हा  परमबीर सिंह असल्याचा खळबळजनक दावा देखील देखमुख यांनी केला आहे. 

परमबीर सिंह यांच्यावर कारवाई न करता संरक्षण का दिले?

गृहमंत्री पदी असताना मी त्यांची खालच्या पदावर बदली केली. तसेच या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या NIA ने कोर्टात जे आरोपपत्र दाखल केले आहे त्यात देखील परमबीर सिंह  यांचा या प्रकरणात मुख्य रोल होता असे नमुद केले आहे. अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवणे तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी प्रदिप शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळतांना मुंबई उच्च न्यायालयाने परमबिर सिंग यांचा या प्रकरणात मुख्य सहभाग असतांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना संरक्षण का देण्यात येत आहे असे ताशेरे सुध्दा देशमुख यांनी ओढले आहेत.

परमबीर सिंह 7 महिने फरार

100 कोटीचा आरोप झाला होता.  1 कोटी 71 लाखाची चार्जशिट दाखल करण्यात आली.  परमबीर यांना सहा वेळा समन्स पाठवून  परमवीर हजर झाले नाही. अटक वॉरटं काढल्यावर ते 7 महिने फरार होते. माझ्यावर आरोप केले होत मग परमवीर यांनी कोर्टासमोर हजर व्हायला पाहिजे होते. मात्र, यानंतर त्यांनी ऐकिव माहितीच्या आधारे चार्चशिट दाखल केले असून अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे कोर्टात सांगितले. परमवीर यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  माझ्यावर आरोप केले म्हणून परमवीर सिंग यांना बक्षिस म्हनून  सरकारने त्यांचे निलंबन रद्द केले आहे असा आरोप देशमुख यांनी केला.