अजित पवार देणार मोठा दिलासा, ही घोषणा करण्याची शक्यता?

अर्थमंत्री अजित पवार यांना जनतेला मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे.  

Updated: Mar 2, 2020, 10:03 AM IST
अजित पवार देणार मोठा दिलासा, ही घोषणा करण्याची शक्यता? title=
संग्रहित छाया

मुंबई : दिल्ली आणि मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तफावत दिसून येत आहेत. देशाच्या राजधानीत पेट्रोल आणि डिझेल दर कमी आहे. त्या तुलनेत मुंबईत हे दर जास्त आहेत. राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आजपासून सुरु होत असलेल्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) हे जनतेला मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. राज्यात इंधनावर अधिक कर लावण्यात आला आहे. हा दर कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे.

गेला जवळपास दीड महिना पेट्रोलचे दर सतत खाली येऊनही पेट्रोल ७५ रुपये लीटरच्या खाली आलेले नाही. देशात इतरत्र मात्र तशी परिस्थिती नाही. पेट्रोलचे दर सत्तरीजवळ आहेत. दिल्लीत एक लीटर पेट्रोलसाठी अवघे ७२ रुपये मोजावे लागताय. तर मुंबईत मात्र एका लीटरचा भाव ७७ रुपये १८ पैसे द्यावे लागत आहेत. 

राज्यात इंधनावर १०० टक्क्यांहून अधिक कर लावण्यात येतो. त्यामुळे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी करणे फक्त अजित पवारांच्या अर्थसंकल्पावर अवलंबून आहे. राज्यातील सध्याच्या  अर्थिक परिस्थितीचा विचार करत अजितदादा कर कमी करणार का, असा प्रश्न आहे. दरम्यान, वाढती महागाई लक्षात घेता अजित पवार जनतेसाठी मोठे पाऊल उचलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

0