Breaking! मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, तीन जवान शहीद

नौदलाकडून या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Updated: Jan 18, 2022, 10:57 PM IST
Breaking! मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, तीन जवान शहीद title=

मुंबई : मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. INS रणवीर (INS Ranvir) युद्धनौकेच्या अंतर्गत भागात एक स्फोट झाला. या स्फोटात भारतीय नौदालचे (Indian Navy) तीन जवान शहीद झाले.

अपघाताची माहिती मिळाताच जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. स्फोटाबाबत माहिती देताना भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, INS रणवीर युद्धनौका क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परतणार होती. या दरम्यान आयएनएस रणवीर युद्धनौकेवर स्फोट झाला आहे.

स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्फोटात INS रणवीर युद्धनौकेचं कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. नौदलाकडून या घटनेची चौकशी सुरु आहे.