तर तिचा जीव वाचला असता, मृत तरुणीने रोहितविरोधात दाखल केली होती तक्रार, पण पोलिसांनी...

Vasai Murder Case: प्रियकराने प्रेयसीची अमानुषपणे हत्या केली आहे. या घटनेने वसई हादरली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 18, 2024, 06:21 PM IST
तर तिचा जीव वाचला असता, मृत तरुणीने रोहितविरोधात दाखल केली होती तक्रार, पण पोलिसांनी... title=
vasai news Man brutally kills ex-girlfriend by hitting her 15 times with spanner

Vasai Murder Case: वसईत प्रियकराने प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार मंगळवारी घडला आहे. या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वसईतील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दिवसा-ढवळ्या रहदारी असलेल्या रस्त्यावरुन तरुणीची हत्या करण्यात आली आहे. रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी व रोहित हे दोघे वसईतील एका खासगी कंपनीत काम करत होते. प्रेमसंबंधातूनच रोहितने तरुणीची हत्या केली आहे. आता या प्रकरणात तरुणीच्या कुटुंबीयांकडून वेगळाच दावा करण्यात येत आहे. 

पडीत तरुणीची बहिण सानिया यादव हिने या प्रकरणात माहिती दिली आहे. आरोपी गेल्या काही दिवसांपासून तरुणीला त्रास देत होता. मागच्या  शनिवारीदेखील त्याने तरुणीला बहिणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याच्या विरोधात पीडत तरुणी व  तिच्या कुटुंबीयांनी आचोळे पोलिस स्थानकात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी एव्हरशाईन येथील चौकीमध्ये पीडीत तरुणी व रोहित यांना बोलावून घेतले होते. यावेळी पोलिसांनी रोहितला मारहाण केली होती, अशी माहिती मयत तरुणीची बहीण सानिया यादव हिने दिली आहे.

काय आहे प्रकरण?

पीडीत तरुणी व रोहित दोघे ही वसईतच एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होते. या दोघांमध्ये प्रेम संबंध होते, मात्र तरुणीचे दुसऱ्यासोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून त्यांच्यात काही दिवसांपासून भांडणे सूरू होती. याच भांडणाचा शेवट करताना रोहितने लोखंडी पाना तरुणीच्या डोक्यात घालून तिची हत्या केली. रोहितने तिच्या डोक्यात तब्बल 15 ते 16 वार केले. त्यामुळं पीडित तरुणीचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  या व्हिडिओनुसार, आरोपी जेव्हा तरुणीवर वार करत होता तेव्हा तिथे नागरिकांची रहदारी सुरू होती. मात्र कोणीही तिला वाचवण्यासाठी पुढे आलं नाही. आरोपी तिच्यावर वार करत असताना बघ्याची गर्दी ही मोठ्या प्रमाणात होती. मात्र कोणीही तिला सोडविले नसल्याचे व्हिडीओ मधून दिसत आहे. जर लोकांनी धाडस करून आरोपीला विरोध केला असता तर आज तरुणीचा जीव वाचला असता अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.