'जीवे मारण्याचा कट, लॉरेन्स बिश्नोईने...' चार्जशिटमध्ये सलमान खानचे धक्कादायक खुलासे

Mumbai Police : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असा खुलासा बॉलिवूडचा भाईजान अर्थत सलमान खानने केला आहे. मुंबई पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात सलमान खानने या प्रकरणी अनेक खुलासे केले आहेत. 

राजीव कासले | Updated: Jul 24, 2024, 06:27 PM IST
'जीवे मारण्याचा कट, लॉरेन्स बिश्नोईने...' चार्जशिटमध्ये सलमान खानचे धक्कादायक खुलासे title=

Salman Khan News : बॉलिवूडचा भाईजान अर्थत सलमान खानने मुंबई पोलिसांसमोर दिलल्या जबाबात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आपल्याला जीवे मारु इच्छितो असा दावा केल आहे. आपल्या मला आणि माझ्या कुटुंबियांना मारण्याच्या उद्देशाने मुंबईतल्या घराबाहेर गोळीबार केल्याचं सलमानने म्हटलं आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणीविरोधी पथकासमोर सलमानने आपला जबाब नोंदवला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये (Chargesheet) सलमानचा (Salman Khan) जबाब नमुद करण्यात आला आहे. 

1735 पानांची चार्जशीट
सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी 1735 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार सलमान खानने लॉरेन्स बिश्नोई गँगकडून आपल्याला आणि कुटुंबाला गेल्या काही वर्षांपासून धमक्या मिळत असल्याचं सांगितलं. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांना आपण प्रत्येक वेळी सतर्क राहाण्यास सांगितलं असल्याचंही सलमानने म्हटलंय.

14 एप्रिललाला सकाळी मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता. त्यावेळी आपण झोपलो होतो, मोठा आवाज झाला. त्यानंतर जवळपास 4.55 मिनिटांनी बॉडिगार्डने दिलेल्या माहितीनुसार बाईकवरुन आलेल्या दोघांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्याच्या दिशेने गोळीबार केला. याआधीही मला आणि कुटुंबाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचं सलमानने म्हटलं आहे. लॉरेन्स बिश्नोई याने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचं आपल्याला सोशल मीडियातून कळाल्याचंही सलमानने सांगितलं.

गँगच्या सदस्याने केला गोळीबार
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी आपल्या घरावर गोळीबार केल्याचा दावा सलमानने केला आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्ट करत हल्ल्यची जबाबदारी स्विकारली होती. लॉरेन्स बिश्नोईने एका मुलाखतीत सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना मारण्याबाबत वक्तव्य केलं होतं. 

अरबाज खानचा जबाबही नोंदवला
सलमान खान आणि त्याचा भाऊ अभिनेता अरबाज खाननचा 4 जूनला जबाब नोंदवण्यात आला. क्राईम ब्रांचच्या चार सदस्यांसमोर दोघांचा जबाब घेतला गेला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जवळपास चार तास क्राईम ब्रांचसमोर होते. 

14 एप्रिलला घरावर गोळीबार
मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या सलमान खानच्या गॅलेक्स येथील निवासस्थानाबाहेर 14 एप्रिल 2024 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी सलमानच्या घराच्या दिशेने 5 गोळ्या झाडल्या. यापैकी 2 गोळ्या इमारतीच्या भिंतीला लागल्या. या हल्ल्यानंतर सलमानची तसेच त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 16 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमधील भूज जिल्ह्यातून सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केली. आरोपींच्या चौकशीमध्ये त्यांना शस्त्रं पुरवाणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली. या दोन आरोपींपैकी एकाने आत्महत्या केली.