Chatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित आहे. प्रतापगडावर (Pratapgad Fort) झालेल्या शिवाजी महाराज आणि अफजलखान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे (Wagnakha) अफजल खानाचा (Afzal Khan) कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याप्रसंगाची इतिहासात महत्वाची नोंद आहे, जी आजही कोट्यवधी शिवभक्तांना प्रेरित करत असते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा (शिवप्रताप स्मारक) उभारण्यासाठी 'हिंदू एकता आंदोलन, सातारा' आणि इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली होती.
याची दखल घेत त्यावेळचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पर्यटन विभागाला तशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता हा पुतळा तयार झाला आहे. शिवरायांच्या पतुळ्याजवळ लाईट आणि साऊंट शोही सुरु करणअयत येणार आहे. प्रतापगड पायथ्याजवळील ( Pratapgad Fort) अफजलखान कबरीजवळचं अतिक्रमण हटवल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा देखावा असणारा छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पहिली झलक#Chhatrapatishivajimaharaj #pratapgad #zee24taas pic.twitter.com/B3pjMvOLBR
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 24, 2024
महाराजांच्या पुतळ्याचं वैशिष्ट्य
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 13 फूट इतकी आहे. तर अफझलखानाच्या पुतळ्यांची उंची 15 फूट इतकी आहे. या पुतळ्याचं अंदाजे वजन 7 ते 8 टन इतकं आहे. हा पुतळा बनवण्यासाठी साधारण 9 महिन्यांचा कालावधी लागलाय. शिल्पकार दिपक थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 कारागिरांच्या अथक मेहनतीतून हा पुतळा साकारण्यात आला आहे.