डोंबिवलीकरांना कोरोनाचे गांभीर्य नाही; सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

मात्र, कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळातही येथील नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. 

Updated: Apr 8, 2020, 12:12 PM IST
डोंबिवलीकरांना कोरोनाचे गांभीर्य नाही; सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी title=

कल्याण: डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढत असतानाही येथील नागरिकांना मात्र परिस्थितीचे थोडेही गांभीर्य नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. एरवी डोंबिवलीकर सुशिक्षितांचे शहर असा दिमाख मिरवत असतात. मात्र, कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळातही येथील नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

डोंबिवली पूर्वेत बुधवारी सकाळी नागरिक कायदा मोडून बिनधास्त बाहेर फिरत होते. गर्दी कमी करण्यासाठी व विनाकारण दुचाकी फिरणाऱ्यांवर पालिका अधिकारी आणि पोलिसांनी नाकाबंदी करुन कारवाई केली. यावेळी विनाकारण बाहेर पूड नका असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले. मात्र, तरीही नागरिकांना अक्कल येत नसल्याचे चित्र आहे. 

'मला राहू द्या ना घरी' पोलिसांचं जनतेला आवाहन

कल्याणमध्येही साधारण अशीच परिस्थिती आहे. महानगपालिकेने भाजीपाला विक्रीसाठी सुरु केलेल्या केंद्रांवर नागरिक विनाकारण मोठी गर्दी करताना दिसत आहेत. येथील फडके मैदानावर बुधवारी लोकांनी नेहमीप्रमाणे मोठी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना अक्षरश: हरताळ फासला जात आहे. कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत कोरोनाचे ३५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील सर्वाधिक वयोवृद्ध कोरोनाग्रस्त दाम्पत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज

दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आज राज्यात कोरोनाचे ६० नवे रुग्ण सापडले. यापैकी ४४ रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०७८ वर गेली आहे.