मुंबईच्या किनाऱ्यावर डॉल्फिन्सचं दर्शन

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन्सचं दर्शन झालं आहे.

Updated: Mar 27, 2020, 11:58 PM IST
मुंबईच्या किनाऱ्यावर डॉल्फिन्सचं दर्शन title=

मुंबई : मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन्सचं दर्शन झालं आहे. अभिनेत्री जुही चावलाने या डॉल्फिन्सचा व्हिडिओ ट्विटरवर शेयर केला आहे. ब्रीच कॅन्डी क्लब जवळच्या किनाऱ्यावर हे डॉल्फिन्स आले असल्याचं जुही चावलाने सांगितलं आहे. मुंबईतली हवा अत्यंत चांगली आणि ताजी आहे, यावर माझा विश्वास बसत नाहीये. ब्रीच कॅन्डी क्लबजवळच्या किनाऱ्यावर मला हे डॉल्फिन्स दिसले. शहरांचं हे लॉकडाऊन एवढंही वाईट नाही, असं जुही चावला तिच्या ट्विटमध्ये म्हणाली आहे.

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये फक्त जीवानावश्यक वस्तूच मिळणार आहेत. संचारबंदी लागू झाल्यामुळे नागरिकांनाही फक्त गरजेच्या वस्तू घेण्यासाठीच घराबाहेर पडता येणार आहे. 

देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८०० पर्यंत पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे १५३ रुग्ण झाले आहेत. कोरोनामुळे देशभरात १७ जणांचा मृत्यू झाला आहे.