तुमच्या घरात, दुकानात, ऑफिसात CCTV आहे? तुमच्याच CCTV तून सारं जग तुम्हाला पाहतंय

देशभरातले जवळपास 1 लाखाहून अधिक CCTV कॅमेरे हॅक करण्यात आले आहेत

Updated: Sep 3, 2021, 09:16 PM IST
तुमच्या घरात, दुकानात, ऑफिसात CCTV आहे? तुमच्याच CCTV तून सारं जग तुम्हाला पाहतंय  title=

शिवांक मिश्रा, झी मीडिया, मुंबई : आपलं घर, दुकान किंवा ऑफिस सुरक्षित असावं, यासाठी अनेकजण CCTV लावतात. पण CCTV खरंच सुरक्षित असतात? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेलं CCTV हॅकिंग.

तुमच्या घराच्या, ऑफिसच्या, दुकानाच्या सुरक्षेसाठी तुम्ही CCTV कॅमेरे लावलेत. पण तिथं नेमकं काय सुरूय, हे केवळ तुम्हीच नाही, तर अख्खं जग पाहतंय. तुमच्या घरात काय सुरूय, याचं इंटरनेटवर लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू आहे.

मुंबई असो, नाहीतर दिल्ली, अगदी कुठलंही शहर, देशभरातले जवळपास 1 लाखाहून अधिक CCTV कॅमेरे हॅक करण्यात आले आहेत. म्हणजे जे काही घडतं ते त्याचेवळी सीसीटीव्हीद्वारे इंटरनेटवरून जगभरात दिसतं. धक्कादायक बाब म्हणजे CCTV लावणाऱ्यांना याची साधी कल्पनाही नसते.

या हॅकिंगपासून बचाव कसा कराल बचाव

सर्वात आधी डिफॉल्ट पासवर्ड बदला आणि स्वतःचा नवा पासवर्ड बनवा, पासवर्डमध्ये अक्षरं, सिम्बॉल आणि नंबरचा समावेश असावा. अगदीच गरजेचं असतील तरच गोपनीय ठिकाणी CCTV कॅमेरे लावावेत.चांगली क्वालिटी आणि ब्रँडचे कॅमेरे खरेदी करावेत. CCTV चं सॉफ्टवेअर सातत्यानं अपडेट करत राहावं

डिजिटल क्रांतीच्या युगात इंटरनेट हे मोठंच वरदान आहे. पण तुम्ही गाफील राहिलात तर हेच वरदान तुमच्यासाठी शाप ठरू शकते. त्यामुळं केवळ CCTV कॅमेरे बसवून निर्धास्त होऊ नका. तर ते सुरक्षित राहतील, यासाठीही डोळ्यात तेल घालून खबरदारी घ्या.