मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर थेट टीका केली आहे.
महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्या आहेत अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. भाजपच्या पोलखोल रथावर हल्ले तरी आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ल साधा गुन्हा दाखल नाही पण महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा, साधी दखल सुद्धा नाही. हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर थेट अटक असं ट्विट फडणवीसांनी केलं आहे.
महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्या आहेत.
भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही
मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही
महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही
हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 23, 2022
राणा दाम्पत्यावर 153 अ नुसार गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली गेली आहे. खार पोलीस उद्या सकाळी 11 वाजता त्यांना कोर्टात हजर करणार आहे.
इतकी दंडुकेशाही
इतका अहंकार
इतका द्वेष
सत्तेचा इतका माज
सरकारच करणार हिंसाचार
एवढीच तुमची मदुर्मकीसत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या
पण, जनता सारे काही पाहते आहे !
निव्वळ लज्जास्पदलोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला?
लोकशाहीचे गार्हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 23, 2022
संजय राऊत, अनिल परब आणि मुख्यमंत्र्यांवर ही गुन्हा दाखल करण्याची मागणी राणा यांनी केली आहे.