"संभाजीनगर, दिबा पाटील नामकरण निर्णय पुन्हा..." देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

Updated: Jun 30, 2022, 06:22 PM IST
"संभाजीनगर, दिबा पाटील नामकरण निर्णय पुन्हा..." देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं title=

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मास्टरस्ट्रोकनं राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदी घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शपथविधी सोहळ्यापूर्वी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचार आणि निर्णयावर त्यांनी निशाणा साधला. तसेच शेवटच्या क्षणी संभाजीनगर, धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं देण्याच्या घोषणेवरही टीका केली. 

"शेवटच्या दिवशी संभाजीनगर झालं. पण केव्हा झालं जेव्हा राज्यपालांचं पत्र आलं तेव्हा. नियमानुसार जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव येत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची नसते. पण जाता जाता संभाजीनगर, धाराशिव, नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव अशा प्रकारचे निर्णय घेतले. आता येणाऱ्या सरकारला हे निर्णय परत घ्यावे लागतील. कारण ते वैध मानले जाणार नाही, पण आमचं त्याला समर्थनच आहे.", असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं.

"शेवटच्या दिवशी संभाजीनगर झालं. पण केव्हा झालं जेव्हा गव्हर्नरचं पत्र आलं तेव्हा..जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव येत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची नसते तेव्हा. जाता जाता संभाजीनगर, धाराशिव, दिबा पाटील अशा प्रकारचे निर्णय घेतले. पण येणाऱ्या सरकारला हे निर्णय परत घ्यावे लागतील. कारण ते वैध मानले जाणार नाही, पण आमचं त्याला समर्थनच आहे.", अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.