बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आज मुंबई उच्च न्यायालयात

पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर राहणार आहेत. डी एस के यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केलाय.  त्यावर गेल्या वेळी कोर्टाने डी. एस. के. यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. 

Updated: Feb 13, 2018, 12:21 PM IST
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आज मुंबई उच्च न्यायालयात title=

मुंबई : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर राहणार आहेत. डी एस के यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केलाय.  त्यावर गेल्या वेळी कोर्टाने डी. एस. के. यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. 

 डी. एस. के. अजूनही अपयशी 

ठेवीदारांचे पैसे परत न केल्या प्रकरणी डी एस कुलकर्णी यांच्या विरोधात पुण्यात गुन्हे दाखल झालेत.  या प्रकरणी अटक टाळण्यासाठी डी. एस. कें.नी हायकोर्टात धाव घेतलीय. अटक टाळण्यासाठी डी. एस. के. यांना ५० कोटी रुपये जमा करण्यास सांगण्यात आल होतं, पण ते जमा करण्यास डी. एस. के. अजूनही अपयशी ठरले आहेत.

'काहीही करा पण पैसे जमा करा'

यावर तीव्र नाराजी व्यक्त करत कोर्टाने काहीही करा पण पैसे जमा करा असं म्हणत स्वत: डी. एस. के. यांनी कोर्टात हजर राहावं असं सांगितलं होतं. त्यानुसार आज ते कोर्टात हजर राहणार आहेत.