राज्यात संचारबंदी आणि प्रवासाला जिल्हाबंदी लागू

कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढलेला नाही. त्यामुळे हा प्रसार थांबवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला 

Updated: Mar 23, 2020, 05:31 PM IST
राज्यात संचारबंदी आणि प्रवासाला जिल्हाबंदी लागू title=

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संचारबंदी लागू केली आहे. तसेच जिल्हाबंदी देखील लागू केली आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहेत. मुंबई, पुणे सारख्या शहरात आजही अनेक नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

तसेच जिल्हाबंदी देखील लागू करण्यात आली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी बंदी लावण्यात आली आहे. अनावश्यक प्रवासाला ही बंदी असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा या सील करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे, सुर्देवाने अजून अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढलेला नाही. त्यामुळे हा प्रसार थांबवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मोठ्या शहरातील लोकांना आवाहन करूनही त्यांनी रस्त्यावर येणं थांबवलं नसल्याने सरकारला हा कठोर निर्णय घ्यावा लागला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे देशांतर्गत विमानसेवा अजूनही सुरू आहे, यावर देखील आपण केंद्राला पत्र पाठवल आहे, देशांतर्गत विमानसेवा देखील लवकरच बंद होईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.