Mumbai Crime News: दहीहंडीला घडलेल्या 'त्या' घटनेचा घेतला बदला; गोळीबारात एकाचा मृत्यू, तिघे जखमी

मुंबईतील कांदिवलीमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. येथे दुचाकीवरून आलेल्या 2 जणांनी 4 राऊंड फायर केले, ज्यात 1 तरुणाचा मृत्यू झाला, तर 3 तरुण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Updated: Oct 1, 2022, 10:44 AM IST
Mumbai Crime News: दहीहंडीला घडलेल्या 'त्या' घटनेचा घेतला बदला; गोळीबारात एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Kandivali Firing:  मुंबईत कांदिवलीमध्ये (kandivali) गोळीबाराची घटना घडली समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चार तरुणांवर गोळीबार केल्यानं एका तरुणाचा मृत्यू (one youth died) झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. जखमी तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंतर्गत वादातून 4 राऊंड गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. (crime news mumbai kandivali gun firing 1 died and 3 injured)

शुक्रवारी (30 सप्टेंबर) रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी बेछूट गोळीबार ( firing) केला.  या भागातील माजी नगरसेवक कमलेश यादव (kamlesh yadav) यांनी गोळी झाडणारी व्यक्ती आणि घटनेतील पीडित व्यक्ती एकमेकांना ओळखत असल्याचं सांगितले. गोळीबाराच्या चार राऊंडमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अंकित यादव (ankit yadav) असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनास दाभोळकर, मनीष गुप्ता आणि प्रकाश नारायण अशी उर्वरित तीन जखमींची नावे आहेत.

वाचा : Petrol Diesel चे आजचे दर काय? कोणत्या शहरांत वाढले दर? पाहा संपूर्ण यादी

जुन्या वादातून ही घटना घडल्याचं पोलिसाकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांचे (mumbai police) डीसीपी विशाल ठाकूर (dcp vishal thakor) यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईकवरून आलेल्या तरूणांनी गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. दोन्ही आरोपींनी एकूण 4 राउंड फायरिंग केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र, या घटनेमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. डीसीपी विशाल ठाकूर यांनी पुढे सांगितलं की, ही घटना रात्री 12.15 च्या दरम्यान घडली. या गोळीबाराच्या घटनेमागे नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे.